Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:32 IST

मराठमोळी सोनाली कुलकर्णीलाही 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही.

सोशल मीडियावर सध्या 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं ट्रेंडिंग आहे. गुलाबी साडीनंतर संजू राठोडच्या या गाण्याने सगळ्यांना वेड लावलंय. शॅकी शॅकी या गाण्यातील 'एक नंबर तुझी कंबर' हे लिरिक्स चाहत्यांच्या मनाला भावले आहेत. कित्येकांनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. काही सेलिब्रिटीही या गाण्यावर थिरकले आहेत. आता मराठमोळी सोनाली कुलकर्णीलाही 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. 

सोनाली कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. अभिनेत्रीने या गाण्याच्या हुक स्टेप्सही केल्या आहेत. 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावरील सोनाली कुलकर्णीचा हा व्हिडिओ चर्चेत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावरचा सोनालीचा हा रील व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

दरम्यान, सोनालीने केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'देऊळ', 'कच्चा लिंबू', 'गुलाबजाम', 'गार्भीचा पाऊस' हे सोनालीचे गाजलेले सिनेमे. याशिवाय 'दिल चाहता है', 'सिंघम', 'अग्नि वर्षा', 'दंश', 'भारत' या हिंदी सिनेमांमध्येही ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी