सौरभ वर्मा दिग्दर्शित विक्की वेलिंगकर सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.“वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते.
सोनालीने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. सोनालीचा ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमा येत्या ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.