Join us

नखरेल नार करील एका बुक्कीत गार..! ‘पांडू’ची ‘उषा’ पाहाल, तर पाहातच राहाल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 17:59 IST

Pandu Movie : पांडूच्या उषाला भेटलात का? तिची एक झलक दाखवणारा व्हिडीओ एकदा पाहाच

‘पांडू’  (Pandu) या आगामी चित्रपटात भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही जोडी दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटातील पांडूची नखरेल उषा पाहाल तर पाहातच राहाल. होय, भाऊ कदमकुशल बद्रिके ही लोकप्रिय व महाराष्ट्राच्या लाडकी जोडी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये आणि सोबतीला सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)आहे.होय, पांडूच्या उषाची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारताना दिसणार आहे. सोनालीचा बेधडक आणि बिनधास्त अंदाज यात पाहायला मिळणार आहे.   सोनालीने पांडूच्या उषाची एक झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘नखरेल नार करील एका बुक्कीत गार... पांडूची उषा आलीये होऊ बुलेटवर स्वार,’ असं कॅप्शन देत सोनालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

यात भाऊ कदम पांडूच्या भूमिकेत तर कुशल बद्रिके महादूच्या भूमिकेत दिसणार आहे.  कुशल आणि भाऊ यांची मैत्री तब्बल 21 वर्षांची आहे. हीच मैत्री तुम्हाला ‘पांडू’ या चित्रपटात दिसणार आहे. या दोघांची कॉमेडी बघायला प्रेक्षक आता खूपच उत्सुक आहेत.   झी स्टुडिओजची निर्मिती असलेला आणि विजू माने यांनी दिग्दर्शित केलेला ‘पांडू’ हा सिनेमा येत्या ३ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  प्रविण तरडेचा आगळा वेगळा करारी बाणा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आगामी   ‘पांडू’ या सिनेमामधून तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र तो या सिनेमात साकारत आहे.याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीही यात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीभाऊ कदमकुशल बद्रिके