Join us

लाजरान साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं, सोनाली कुलकर्णीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:53 IST

सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे.

महाराष्ट्राची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे चर्चेत असते. इंडियन असो किंवा मग वेस्टन सोनाली नेहमीच चाहत्यांच लक्षवेधून घेताना दिसते.  सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणारी सोनाली नेहमीच तिच्या सेटवरील व्हिडिओज किंवा फोटोज शेअर करताना दिसते..नुकताच सोनालीनं साडीसोबत खेळतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओतील सोनालीच्या हास्यावर आणि तिच्या अदांवर चाहते घायाळ झालेत.. तिनं केलेला पारंपारिक लूकला चाहत्यांनी पसंती दर्शवलीये.

लवकरच सोनालीचे झिम्मा हा सिनेमा रिलीज होणार आहे.. कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.. तर 'छत्रपती ताराराणी' आणि  फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिलीये.

सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनाली हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी