Join us

उफ्फ... खऱ्या आयुष्यातही सोनाली आहे अप्सरा, पाहा तिचे घायाळ करणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 07:15 IST

सोनाली मराठीतील अप्सरा म्हणून ओळखलं जाते.

 सोनालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनाली भलतीच हॉट दिसतेय. सोनालीच्या या फोटोवर तिचे फॅन्सही फिदा झाले आहेत. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलायं.

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.   

सोनालीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी