Join us

'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'च्या भारतीय व्हर्जनमध्ये दिसणार ही अभिनेत्री, बोल्ड सीन्सचा असणार भडीमार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 15:03 IST

दिग्दर्शक अभिनव सिन्हा अॅडल्ड सिनेमा 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' ने प्रेरित होऊन एक म्युझिक अल्बम काढणार आहेत.

मुंबई : 'जन्नत' या सिनेमात दिसलेली अभिनेत्री सोनल चौहान या सिनेमानंतर फार चर्चेत नव्हती. अनेक वर्षांपासून ती कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. पण आता ती एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक अभिनव सिन्हा अॅडल्ड सिनेमा 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' ने प्रेरित होऊन एक म्युझिक अल्बम काढणार आहेत. या म्युझिक अल्बममध्ये सोनल दिसणार आहे. 

या 'म्युझिक अल्बमचं नाव 'फाइव्ह शेड्स ऑफ लव्ह' असं असणार आहे. या म्युझिक अल्बमला जुबिन नौटीयाल आपला आवाज देणार आहे. सोनल पहिल्यांदाच एका म्युझिक अल्बममध्ये काम करणार आहे. सध्या ती जे.पी.दत्ता यांच्या 'फलटन' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  

अभिनव सिन्हा करत असलेल्या म्युझिक अल्बममधील दोन गाण्यांमध्ये सोनल दिसणार आहे. ही गाणी रोमॅंटिक आणि बोल्ड असणार आहे. या गाण्यांचं शूटिंग लंडनमध्ये केलं जाणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी