सेलिब्रिटींचं घर कसं असेल, त्यांच्या घरात काय आहे, त्यांनी घर कसं सजवलं आहे हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यातील विशेषतः घराबाबत प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळावी किंवा त्याची माहिती मिळावी अशी रसिकांची इच्छा असते. प्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचेही घर असंच आलिशान आहे.
खरंतर सोनाक्षी सिन्हासाठी ही दिवाळी खूप खास ठरली आहे. सुप्रसिद्ध डिझायनर रुपिन सूचकने सोनाक्षीचे घर डिझाइन केले आहे. पहिल्यांदाच सोनाक्षीच्या घराचे आतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षीच्या घराचे इंटिरियर डिझायनिंग कसे केले गेले हे फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता. घराची सजावटही खूप सुंदर केली आहे.
इंटिरियर डिझायनर रूपिनने सोनाक्षीच्या घराच्या या नव्या लुकबद्दल बोलताना सांगितले की ही जागा खूपच सुंदर आहे. त्याच्या भूमितीय आकाराकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. घरात एक आनंदी वातावरण मनाला वेगळीच शांती मिळते. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल.
घराचे पुनर्रचना करताना सोनाक्षीच्या आवडी- निवडीची विशेष काळजी घेतली गेली आहे. घरातल्या छोट्यातल्या छोट्या जागेचा योग्य वापर होईल याची काळजी घेण्यात आली आहे. सोनाक्षी सिन्हालाही तिचे नवीन घर खूप आवडले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन तिने आनंद व्यक्त केला आहे.