Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक नव्हे तब्बल ८ वन नाईट स्टँड! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "एकदा तो ऐशला घेऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 11:41 IST

सोमीने भाईजानबाबत धक्कादायक खुलासा केला. सलमानच्या वन नाईट स्टँडला कंटाळून बॉलिवूड सोडल्याचं सोमीने म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सलमानच्या बॉलिवूडमधील करिअरबरोबरच त्याचं लव्ह लाइफही चर्चेत होतं. अनेक अभिनेत्रींबरोबर भाईजानचं नाव जोडलं गेलं होतं. यापैकीच एक होती ती म्हणजे सोमी अली. सलमान आणि सोमी अलीचं अफेअर होतं. पण, काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर सोमी अलीने बॉलिवूडलाही रामराम केला. नुकतंच सोमीने सलमानबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

सोमीने नुकतंच reddit वर तिच्या चाहत्यांसोबत askme सेशन घेतलं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सोमीने उत्तरं दिली. एका चाहत्याने सोमीला बॉलिवूड का सोडलं? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सोमीने भाईजानबाबत धक्कादायक खुलासा केला. सलमानच्या वन नाईट स्टँडला कंटाळून बॉलिवूड सोडल्याचं सोमीने म्हटलं आहे. "सलमानच्या एक नाही तर आठ वन नाईट स्टँडला मी कंटाळले होते. त्याबरोबरच रोज मला शारीरिक आणि मानसिकरित्या चुकीची वागणूक मिळत होती. जेव्हा माझा बॉयफ्रेंड ऐश नावाच्या मुलीला घेऊन आला, तेव्हा मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्या वन नाइट स्टँडला कंटाळले होते. नंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं", असं सोमीने म्हटलं आहे. 

याबरोबरच सोमीने सलमानसाठी बॉलिवूडमध्ये आल्याचं देखील सांगितलं. ती म्हणाली, "मी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनण्यासाठी नाही तर सलमानसाठी आले होते. सलमान माझा क्रश होता". खरं तर सलमानचं लग्नदेखील सोमी अलीमुळेच तुटलं होतं. संगीता बिजलानीसोबत सलमान लग्न करणार होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण, लग्नाच्या काही दिवस आधीच संगीताने सलमान आणि सोमी अलीला रंगेहाथ पकडलं होतं. 

दरम्यान, सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यानंतर सोमी अली भाईजानसाठी धावून आली होती. तिने बिश्नाईला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं असंही तिने म्हटलं होतं. आता पुन्हा सलमानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. 

टॅग्स :सलमान खानसोमी अलीसेलिब्रिटी