Join us

अफेअरच्या चर्चेदरम्यान कियारा आणि सिद्धार्थने केलं असं काही, ज्यानं उंचावल्या सर्वांच्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 14:15 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते आणि बऱ्याचदा ते दोघे त्यामुळे चर्चेत येत असतात. दरम्यान आता त्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.जे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

खरेतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी नुकतेच न्यु इअर सेलिब्रेट करून मालदीवहून परतले आहेत. त्यांचे सर्व फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या कियारा आणि सिद्धार्थचे असे काही फोटो समोर आले आहेत ज्यात ते दोघे एक सारख्या पिवळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहेत.

खरेतर, कियाराने व्हॅकेशन दरम्यानचा एक फोटो शेअर केला होता ज्यात तिने चेहरा टोपीने झाकला होता आणि पिवळ्या रंगाचा शर्ट श्रगसारखा वापरला होता.तर सिद्धार्थ मालदीवहून कियारासोबत परतला तेव्हा तो देखील तशाच पिवळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसला.

असाच चाहत्यांचे म्हणणे आहे की कियाराने स्टायलिश लूकसाठी सिद्धार्थचा शर्ट वापरला होता. यावरून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचा प्रुफ आहे.

सिद्धार्थ आणि कियारा जेव्हा सुट्टीवर जाताना स्पॉट झाले होते त्यावेळी दोघांनी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला होता. दोघांचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले तर त्यांनी मालदीव व्हॅकेशनचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

अद्याप त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल चुप्पी साधली आहे. त्यांच्या चाहत्यांना ही जोडी खूप भावते. 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा