Join us

कोणी म्हटलं चेटकीण तर कुणी कलंक..., पतीच्या निधनानंतर अभिनेत्री रेखा यांचा स्टार्स करु लागले होते तिरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:31 IST

Actress Rekha : एकेकाळी रेखा सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटीपर्यंत सर्वांच्या रोषाची शिकार झाली होती.

रेखा (Rekha) चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. यासोबतच त्यांच्या आयुष्यातील अशी अनेक न सुटलेली रहस्ये आहेत जी आजपर्यंत उलगडलेली नाहीत. यातीलच एक म्हणजे रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांची आत्महत्या. ज्यासाठी कुठेतरी रेखा यांना जबाबदार धरले जाते. मात्र, रेखा यांच्या चरित्रात मुकेश यांना एक मानसिक आजार असल्याचा उल्लेख आहे, जो त्यांनी जगापासून लपवून ठेवला होता.

रेखा यांनाही लग्नानंतर याची माहिती मिळाली. याशिवाय रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या रिलेशनशीपच्या बातम्यांनीही उधाण आले होते. त्यानंतर अनेक लोक रेखा यांचा तिरस्कार करू लागले. त्यात काही चित्रपटसृष्टीतील स्टार्सच्या नावांचाही समावेश आहे. चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी रेखा यांना चित्रपटसृष्टीवरील कलंक म्हटले होते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, 'रेखा यांनी चित्रपटसृष्टीच्या चेहऱ्यावर इतका कलंक लावला आहे की तो सहज धुवून काढणे कठीण होईल. मला वाटतं यानंतर कुठलंही आदरणीय कुटुंब कोणत्याही अभिनेत्रीला त्यांची सून म्हणून स्वीकारण्यापूर्वी दोनदा विचार करेल. व्यावसायिकदृष्ट्याही तिच्यासाठी हे कठीण जाणार आहे. तिच्यासोबत कोणताही चांगला दिग्दर्शक पुन्हा काम करणार नाही. प्रेक्षक तिला भारताची स्त्री किंवा न्यायदेवता म्हणून कसे स्वीकारतील?'

'ती बनलीय राष्ट्रीय खलनायक'अनुपम खेर यांनीही रेखाला राष्ट्रीय खलनायक ठरवत त्यांच्यावर टीका केली होती. बॉलिवूड शादीजच्या रिपोर्टनुसार, एकदा अनुपम खेर एका मुलाखतीत म्हणाले होते, 'ती राष्ट्रीय खलनायक बनली आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या, मला वाटते की तो तिच्यासाठी एक पडदा आहे. म्हणजे मी तिच्या समोर आलो तर माझी प्रतिक्रिया काय असेल हे मला माहीत नाही.

टॅग्स :रेखा