Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोहा अली खानला करायचंय मराठी सिनेमात काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 06:00 IST

बॉलिवूडची अभिनेत्री सोहा अली खानने बॉलिवूडसोबत बंगाली सिनेमात काम केले आहे आणि आता तिला मराठी चित्रपटात काम करायचे आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री सोहा अली खानने बॉलिवूडसोबत बंगाली सिनेमात काम केले आहे आणि आता तिला मराठी चित्रपटात काम करायचे आहे.

सोहा अली खान म्हणाली की, प्रादेशिक चित्रपटांना वास्तवाचा गंध असतो. पण भाषेच्या अडचणींमुळे प्रादेशिक सिनेमांमध्ये काम करता येत नाही. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सोहाला अनेक मराठी सिनेमांच्याही ऑफर्स आल्या होत्या पण मराठी येत नसल्यामुळे त्या नाकाराव्या लागल्या असे तिने सांगितले.

यावेळी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सोहने प्रादेशिक सिनेमांबद्दल सांगितले की, प्रादेशिक चित्रपट संस्कृतीचे खरे रुप आपल्या समोर उभे करतात. भाषे अभावी मी बऱ्याच प्रादेशिक सिनेमांमध्ये काम करू शकले नाही. मला वाटते तुम्ही एखाद्या सिनेमात काम करणार असाल तर त्याची भाषा तुम्हाला येणे गरजेचे आहे परफॉर्मन्स उत्तम होण्यासाठी हे खूप गरजेचे असते. त्यामुळेच मी आतापर्यंत हिंदी, बंगाली आणि इंग्रजी सिनेमात काम केले आहे.

सोहाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर ती बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडपासून लांब आहे. दिल मांगे मोर या चित्रपटातून २००४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर ती रंग दे बसंती या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

अभिनेता कुणाल खेमूने जानेवारी २०१५मध्ये अभिनेत्री सोहा अली खानसोबत लग्न केले आणि २०१७ मध्ये सोहाने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव इनाया आहे. आता ती दोन वर्षांची आहे. 

टॅग्स :सोहा अली खानकुणाल खेमू