Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्या लोकांना उत्तरं देणे मला गरजेचे वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते - नेहा पेंडसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 13:33 IST

नेहा पेडसेने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.

बेधडक, बिनधास्त आणि रोखठोक अंदाजासाठी नेहा पेंडसे ओळखली जाते. अनेकदा या गोष्टीची प्रचिती चाहत्यांना आली आहे. वेळ पडली तर नेहा देखील आपली योग्य बाजु मांडताना दिसते. सध्या काहीही केले तरी सोशल मीडियावर सेलिब्रेटींना नेटीझन्स ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे. नेटीझन्स काहीही विचार न करत सेलिब्रेटींना विनाकारण ट्रोल करत असतात. सेलिब्रेटींनी साधा फोटो शेअर केला आणि तो त्यांना आवडला नाही तर ट्रोल करणे सुरु होते. हीच गोष्ट नेहा पेंडसेला फार खटकत असल्याचे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. 

अनेकदा सेलिब्रेटींच्या सिनेमापेक्षा  त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगलेली असते. त्यामुळे अशा ट्रोलर्सना उत्तर देणे मी गरजेचे समजत नाही. मुळात त्यांना उत्तर देण्यात कोण वेळ वाया घावलेल इतके माझ्या पेशंसही नाहीत. अनेकदा मलाही ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.  मात्र या गोष्टींचा मला फारसा फरत पडत नाही.  मी अशा ट्रोलर्सना दुर्लक्षित करणेच पसंत करत असल्याचे तिने म्हटलंय.

मध्यंतरी नेहा तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल झाली होती. इतकेच काय तर तिच्या लग्नावेळी देखील तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. उद्योगपती शार्दुल सिंग बयास याच्यासोबत नेहाने मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. तिचे फोटो बघून नेहाने पैशांसाठी लग्न केले, असे नको नको ते बोलत ट्रोलर्सनी तिला सुनावले होते. तेव्हा मात्र नेहाचा पारा चांगलाचा चढला होता.

नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे.

लग्नानंतर मात्र ती कोणत्याही मालिकेत झळकली नव्हती. आता पुन्हा एकदा नेहा 'भाभीजी घर पर है' मालितकेत दणक्यात एंट्री केली आहे. 'अनिता भाभी' बनत पुन्हा एकदा तिचे दर्शन रसिकांना घडत आहे. अनेक दिवसांपासून तिचे चाहते तिला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर या मालिकेच्या निमित्ताने नेहाच्या चाहत्यांचीही ईच्छा पूर्ण झाली आहे. 

टॅग्स :नेहा पेंडसे