Join us
Daily Top 2Weekly Top 5

टिकटॉक स्टार प्रतीक खत्रीवर काळाची झडप, अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 10:04 IST

धक्कादायक!!

ठळक मुद्देइन्स्टाग्रामवर प्रतिकचे 42 हजारहून जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचे चाहते दिवसेंदिवस वाढत होते.

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि टिकटॉक स्टार म्हणून ओळखला जाणारा प्रतिक खत्रीचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी रात्री एका भीषण कार अपघातात त्याने जागीच प्राण सोडला. त्याच्या अकाली निधनाने सर्वांना धक्का बसला आहे.  प्रतिक सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होता. इन्स्टाग्रामवर त्याचे 42 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल देखील झाले आहेत. मंगळवारी रात्री त्याच्यावर काळाने झडप घातली.

मंगळवारी रात्री उशिरा बागपत येथून तो त्याच्या डेहराडून मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाला होता. साखन कला या गावानजिक   एका ट्रकने त्याच्या कारला जोरदार धडक दिली. जागीच प्रतिकचा मृत्यू झाला. त्याच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्याच्या जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. अभिनेत्री आणि टिकटॉक स्टार आशिका भाटिया हिने देखील सोशल मीडियावर प्रतिकबरोबरचा फोटो शेअर करत तिचे दु:ख व्यक्त केले आहे.  ‘विश्वास बसत नाहीये,’असे तिने लिहिले आहे. 

 दोन दिवसांपूर्वीच पोस्ट केला होता व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर प्रतिकचे 42 हजारहून जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचे चाहते दिवसेंदिवस वाढत होते. त्याचे व्हिडीओ क्षणात व्हायरल होत. दोन दिवसांपूर्वीच प्रतिकने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. मात्र प्रतिक खत्रीच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :टिक-टॉक