Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहा वाघ सध्या जिममध्ये गाळतेय घाम, ह्या व्यक्तींनी केले प्रेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:00 IST

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील चंद्रगुप्त मौर्य मालिकेत मूराची भूमिका साकारणारी स्नेहा वाघ पुन्हा प्रत्यक्ष जीवनात फिट होण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील चंद्रगुप्त मौर्य मालिकेत मूराची भूमिका साकारणारी स्नेहा वाघ पुन्हा प्रत्यक्ष जीवनात फिट होण्यासाठी प्रयत्नशील आहे. अलीकडेच स्नेहाने सोशल मीडियावर आपल्या सहकलाकारांना टॅग करून काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत आणि त्याबरोबर असे नमूद केले आहे की, त्यांच्यामुळे ती जिममध्ये जाऊ लागली आहे.

याविषयी बोलताना स्नेहा म्हणाली की, “डॉक्टरचा सल्ला असून देखील मी जिममध्ये जाण्यास तयार नव्हते. पण माझे सहकलाकार, कार्तिकेय मालवीय (जो चंद्रगुप्त मौर्याची भूमिका करत आहे) आणि सौरभ राज जैन (जो धनानंदाची भूमिका करत आहे) यांनी माझ्यामागे जिममध्ये जाण्यासाठी तगादा लावला. ते सतत मला इतके टोकत होते की शेवटी मी जिममध्ये जाण्याचे ठरवले. मी काही छायाचित्रे पोस्ट करून त्यांना टॅग केले, म्हणजे त्यांची खात्री पटेल. पण दुसर्‍या दिवशी सौरभ आणि कार्तिकेय मला म्हणाले की, मी फक्त फोटो पोस्ट करण्यापुरती जिममध्ये गेले असेन आणि तेथे कसरत केलीच नसेल हेही शक्य आहे. त्यामुळे आता मी कसरत करतानाचा माझा व्हिडिओ पोस्ट करण्याचे ठरवले आहे जेणे करून शंकेला जराही स्थान राहणार नाही.”

स्नेहा एक अत्यंत प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्री आहे आणि चंद्रगुप्त मौर्य मालिकेतील तिच्या भूमिकेची खूप प्रशंसा होत आहे. स्नेहाला आपल्या व्यस्त दिनक्रमामुळे व्यायामासाठी वेळच मिळत नव्हता. अलीकडेच डॉक्टरांनी तिला जिम सुरू करण्याचा सल्ला देखील दिला. जेणेकरून तिला तणावमुक्त होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर तिचा स्टॅमिना देखील वाढेल, जे तिच्यासाठी आवश्यक आहे.

चंद्रगुप्त मौर्य मालिकेतील सहकलाकारांच्या प्रेमळ हट्टामुळे अखेरीस स्नेहाने व्यायामाला सुरुवात केली.

टॅग्स :स्रेहा वाघ