Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती मानधनाचं बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना 'कोकण हार्टेड गर्ल'चं सडेतोड उत्तर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:38 IST

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.

Smriti Mandhana Body Shaming : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न रद्द झाल्यामुळे काही काळापासून ते सातत्याने चर्चेत होते. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅकसारखी लक्षणं जाणवल्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की पलाश मुच्छलने स्मृतीची फसवणूक केल्यामुळे हे लग्न तुटलं. सोशल मीडियावर अनेक दिवस अफवा पसरल्यानंतर काही दिवसांपूर्वीच स्मृती आणि पलाश यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर निवेदन जाहीर करत आता आम्ही लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं. लग्न मोडल्यानंतर स्मृती पुन्हा मैदानावर परतली आहे. अलिकडेच ती एका कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसली. पण, यावेळी ती सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. काही जणांनी स्मृती मानधनाचं बॉडी शेमिंग करायला सुरुवात केली. पण, या ट्रोलर्सना 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर हिनं चांगलंच धारेवर धरले.

 अंकितानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. तिनं लिहलं, देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूला तिच्या शरीरावरुन नाही तर तिच्या योगदानावरुन मोजा. शरीरांवर टिप्पणी करणे थांबवा आणि तिच्या कामगिरींचा आदर करायला सुरुवात करा", असं म्हणतं अकिंतानं या ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 स्मृतीची सलमान खानशी केली तुलना

स्मृती अलिकडेच कार्यक्रम बंगळुरु येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाली. स्मृतीचे बंगळुरुतील कार्यक्रमाचे फोटो जोरदार व्हायरल झाले.स्मृतीला पुन्हा एकदा आनंदात आणि हसताना पाहून तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला. अनेकांनी तिचे कौतुक करत तिला पाठिंबा दिला. मात्र, ट्रोलर्सनी तिला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. स्मृतीच्या सौंदर्यावरून आणि शारीरिक ठेवणीवरून कमेंट्स करण्यात आल्या. काही ट्रोलर्सनी स्मृतीच्या या फोटोंची तुलना बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्याशी केली. ट्रोलर्सनी स्मृतीच्या फोटोसोबत सलमान खानचा फोटो 'कोलाज' करून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तिची थट्टा उडवण्यास सुरुवात केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana trolled; 'Konkan Hearted Girl' slams body shaming.

Web Summary : Smriti Mandhana faced body shaming after her wedding cancellation. 'Konkan Hearted Girl' Ankita Valavalakar defended her, urging respect for her contributions, not appearance. Trollers compared her to Salman Khan.
टॅग्स :स्मृती मानधनाअंकिता प्रभू वालावलकर