Join us

'क्योंकी सास भी कभी बहू थी'साठी स्मृती ईराणी यांनी घेतला राजकारणातून ब्रेक? जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:54 IST

Smriti Irani : अभिनेत्री स्मृती ईराणी लवकरच एकता कपूरची मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी २'मध्ये दिसणार आहेत. या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे.

अभिनेत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) लवकरच एकता कपूरची मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी २' (Kyonki Saas Bhi Bahu Thi 2)मध्ये दिसणार आहेत. या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनी त्यांना राजकारणातून ब्रेक घेण्याबद्दल विचारले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. स्मृती ईराणी यांनी स्पष्ट केले की त्या राजकारणातून ब्रेक घेत नाही आहेत.

एका चाहत्याने लिहिले होते की, प्रिय स्मृती ईराणी, टीव्हीवर परतल्याबद्दल अभिनंदन. मला आशा आहे की हा राजकारणातून एक छोटासा ब्रेक असेल. यावर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली. स्मृती इराणी यांनी एक्स अकाउंटवर लिहिले की, 'कोणताही ब्रेक घेतलेला नाही. मी गेल्या २५ वर्षांपासून मीडिया आणि राजकारण दोन्हीमध्ये काम करत आहे. मी फक्त कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारीमुळे ब्रेक घेतला आहे. मी माझ्या संस्थेच्या जबाबदाऱ्यांशी कधीही तडजोड केलेली नाही आणि करणारही नाही'.

एका युजरने लिहिले की, 'टीव्हीवर परतण्याच्या तुमच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मी आणि माझ्यासारखे तुमचे अनेक चाहते राजकारणातही तुमची उपस्थिती अपेक्षित आहे. विशेषतः बंगाल आणि उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान. माझ्या आईला मालिकेबद्दल ऐकून खूप आनंद झाला आहे.' यावर उत्तर देताना स्मृती ईराणी यांनी लिहिले की, ''तुमच्या आईला शुभेच्छा. येत्या निवडणुकीदरम्यान संघटना जे काही काम सोपवेल त्यात माझे राजकीय योगदान राहील याची खात्री बाळगा.''

'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधला पहिला लूक'क्योंकी सास भी कभी बहू थी'बद्दल बोलताना, स्मृती ईराणी यांचा पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. पहिल्या लूक व्हिडीओमध्ये स्मृती ईराणी मरून रंगाच्या साडीत दिसल्या होत्या. मालिकेत स्मृती ईराणी तुलसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. चाहते त्यांना मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अमर उपाध्याय देखील या शोमध्ये दिसणार आहेत.

टॅग्स :स्मृती इराणी