Join us

Sikandar Teaser: "हिसाब नही इन्साफ करने आया हू.."; सलमान खानचा लक्षवेधी स्वॅग, 'कटप्पा'च्या खलनायकाची चर्चा

By देवेंद्र जाधव | Updated: February 27, 2025 16:35 IST

सलमान खानच्या बहुचर्चित 'सिकंदर' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा (sikandar, salman khan)

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना ज्या सिनेमाची उत्सुकता होती तो सिनेमा म्हणजे 'सिकंदर'. (sikandar) काल महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर  'सिकंदर' सिनेमा कधी येणार याची तारीख अन् वेळ निर्मात्यांनी जाहीर केली होती. अखेर आज (२७ फेब्रुवारी)  'सिकंदर'चा हटके टीझर रिलीज झालाय. सलमान खान(salman khan) पुन्हा एकदा त्याच्या रॉकिंग स्वॅगमध्ये लक्ष वेधतोय. सलमानच्या जोडीला रश्मिका मंदाना (rashmika mandanna) आणि 'कटप्पा' फेम अभिनेता सत्यराज खलनायक म्हणून समोर येतोय. (sikandar teaser)'सिकंदर'च्या टीझरमध्ये काय?

'सिकंदर'च्या टीझरमध्ये सुरुवातीला बॅकग्राऊंडला सलमान खानचा आवाज दिसतो. आजीने नाव सिकंदर ठेवलं होतं, आजोबांनी संजय तर जनतेने राजासाब. हिसाब नही इन्साफ करने आया हू, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, अशा हटके संवादांनी 'सिकंदर'च्या टीझरची सुरुवात होते. नंतर सलमान विमानात शत्रूंशी लढताना दिसतो. पुढे मंत्र्याच्या भूमिकेत सत्यराज पाहायला मिळतात. याशिवाय टीझरमध्ये सलमान - रश्मिकाचा रोमँटिक अंदाजही बघायला मिळतो. १ मिनिटं २१ सेकंदाच्या या टीझरमध्ये सलमानचा हटके स्वॅग लक्ष वेधून घेतोय. 

कधी रिलीज होणार 'सिकंदर'?

संपूर्ण टीझरमध्ये सलमान खानचा अॅक्शन अवतार बघायला मिळतोय. टीझरमधून कथेचा अंदाज लावणं कठीण आहे. तरीही हा टीझर अल्पावधीत व्हायरल झालाय. सलमान सिनेमात संजय राजकोट या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानासईश्रीची भूमिका साकारणार आहे तर अभिनेते सत्यराज मिनिस्टर प्रधानच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय सिनेमात शर्मन जोशी, प्रतीक बब्बर हे कलाकारही झळकणार आहे. ए. आर. मुरुगोदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय तर साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. २०२५ च्या ईदमध्ये म्हणजेच पुढील महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानाशरमन जोशीप्रतीक बब्बरबॉलिवूड