Join us

Video : सिद्धार्थ-शहनाजचा 'तो' रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 14:54 IST

Sidharth shukla: सिद्धार्थच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का त्याची मैत्री शहनाज गिल हिला बसला आहे.

ठळक मुद्देबिग बॉसच्या घरात भेट झालेल्या या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं म्हटलं जातं.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. यामध्येच सिद्धार्थच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का त्याची मैत्री शहनाज गिल हिला बसला आहे. शहनाज आणि सिद्धार्थ यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक होती. बिग बॉसच्या घरात भेट झालेल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे सिद्धार्थच्या निधनामुळे शहनाज हवालदिल झाली आहे. त्यातच सोशल मीडियावरही शहनाज आणि सिद्धार्थचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्येच सिद्धार्थ-शहनाजचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांची उत्तम केमिस्ट्री दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका म्युझिक अल्बममधील आहे. यात सिद्धार्थ आणि शहनाज यांची उत्तम केमिस्ट्रीसोबतच त्यांच्यातील प्रेमदेखील दिसून येत आहे. 'बिग बॉस १३'नंतर ही जोडी अनेक म्युझिक अल्बममध्ये एकत्र झळकली होती. मात्र, भूला दुंगा हा म्युझिक अल्बम त्यांचा अखेरचा ठरल्याचं सांगण्यात येतं. या अल्बममध्ये दोघांनीही 'भूला दुंगा' या रोमॅण्टिक गाण्यावर डान्स केला होता. विशेष म्हणजे हाच या दोघांचा अखेरचा रोमॅण्टिक व्हिडीओ ठरला आहे.

खोडसाळपणा! सिद्धार्थ शुक्लाऐवजी नेटकऱ्यांनी वाहिली 'या' अभिनेत्याला श्रद्धांजली 

दरम्यान, 'भूला दुंगा' मधील अखेरचा बांगड्यांचा सीन सिद्धार्थ आणि शहनाजचा फेवरेट सीन होता असं म्हटलं जातं. सिद्धार्थचं २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून आज (३ सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लासेलिब्रिटी