Join us
Daily Top 2Weekly Top 5

९वी इयत्तेत या कारणामुळे नापास झाला होता सिद्धार्थ मल्होत्रा, कारण वाचल्यावर तुम्हाला येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 20:23 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या आगामी चित्रपट जबरिया जोडीच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या आगामी चित्रपट जबरिया जोडीच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच त्यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सिद्धार्थने त्याच्या शालेय जीवनातील काही किस्से सांगितले. 

सिद्धार्थने सांगितलं की, एका मुलीमुळे तो नववी इयत्तामध्ये नापास झाला होता. त्या मुलीमुळे त्याचे अभ्यासावरील लक्ष उडाले होते. मात्र या टर्निंग पॉइंटमुळे त्याच्या आयुष्यात खूप बदल झाल्याचं तो सांगतो. तो म्हणाला की, मी शाळेत नवीन गोष्ट शिकलो. त्यानंतर मी दहावी व अकरावीत चांगले गुण मिळविले होते.

सिद्धार्थचा आगामी चित्रपट जबरिया जोडी जबरदस्ती लग्न लावून दिलं जातं,त्यावर आधारीत आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये चित्रपटाच्या थीमवर आधारीत प्रश्न विचारला की, सिद्धार्थ आणि परिणीती या दोघांपैकी एका कोणाचं किडनॅप करावं लागलं तर कोण असेल? या प्रश्नाच्या उत्तरात परिणीती म्हणाली की, मी सैफ अली खानला किडनॅप करेन. मी करीनाला कित्येकदा सांगितलं आहे की मला सैफचं काम खूप आवडतं.

त्यानंतर सिद्धार्थने उत्तर दिलं की, मी सैफ व करीनाचा मुलगा तैमुरला किडनॅप करेन.

जबरिया जोडी चित्रपटातील जिला हिले हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रापरिणीती चोप्राद कपिल शर्मा शो