Join us

Wedding Bells! सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या खरेदीला सुरूवात, संगीत सेरेमनीपासून लग्नापर्यंत सुरूये प्लानिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 16:02 IST

सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं हे लव्ह बर्ड्स लवकरच लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये.

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)आणि कियारा अडवाणी (Kiara Advani ) दोघंही प्रेमात आहेत, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. अद्याप अधिकृतपणे दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. पण आता हे नातं लग्नापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं हे लव्ह बर्ड्स लवकरच लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये. आता बातम्या येत आहेत की या दोघांच्या लग्नाची खरेदी सुरू झाली असून संगीत सोहळ्यातील गाण्यांची लिस्टदेखील तयार झाली आहे.

सिड-कियाराच्या लग्नाची शॉपिंग सुरुबी-टाऊनमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या लग्नाची बातमी चांगलीच चर्चेत आहे. सिड-कियाराचे चाहते त्यांच्या आवडत्या कपलशी लग्नाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान, इंडिया टुडेच्या बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नापूर्वीच्या हळदीसाठी कुटुंबातील मेंबर्सनी पिवळ्या कपड्यांची खरेदी सुरू केली आहे.

तसेच या कपलनं संगीत सोहळ्यासाठी त्यांच्या 'शेरशाह' चित्रपटातील 'राता लंबिया' या सुपरहिट गाण्याची निवड केली आहे. रिपोर्टनुसार सिद्धार्थ आणि किआरानेही लग्नासाठी राजस्थानलाच पसंती दिली आहे. जैसलमेर ज्याला गोल्डन सिटी म्हणले जाते अशा ठिकाणी सिड किआरा विवाहबद्ध होणार आहेत. याआधी  प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह सोहळाही राजस्थानमध्ये एका शाही महालात पार पडला होता. त्यानंतर लगोलग कॅटरिना आणि विकीनेही राजस्थानच्या पॅलेसमध्ये लग्न केले होते. जैसलमेरनंतर सिड आणि कियारा लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन मुंबईत होणार आहे, ज्यामध्ये इंडस्ट्रीतील सर्व सुपरस्टार्स सहभागी होणार आहेत.

‘लस्ट स्टोरीज’च्या रॅपअप पार्टीत कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट झाली. त्यानंतर ‘शेरशाह’ सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. या सिनेमात दोघेही मुख्य भूमिकेत होते.  

 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रा