बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच आईबाबा होणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन कियारा-सिद्धार्थने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर पहिल्यांदाच हे कपल कॅमेरासमोर दिसलं. कियारा आणि सिद्धार्थला नुकतंच एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.
आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज दिल्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसले. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गरोदर कियाराची काळजी घेताना दिसत आहे. तिचा हात पकडून तिला घेऊन जात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत सिद्धार्थचं कौतुक केलं आहे.
कियारा आणि सिद्धार्थने फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर त्यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला पडला. आता लग्नानंतर दोन वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. दरम्यान, कियारा अडवाणीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अलिकडेच 'गेम चेंजर' या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात तिने साऊथ स्टार राम चरणसोबत स्क्रीन शेअर केली होती. तर सिद्धार्थ मल्होत्रा 'परम सुंदरी' या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.