Join us

सिद्धार्थ मल्होत्रा विक्रम बत्रा बायोपिकच्या शूटिंगला ह्या दिवशी करणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 08:00 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी विक्रम बत्रा बायोपिक पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये फ्लोअरवर जाणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या परिणीती चोप्रासोबत जबरिया जोडी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा मिलाप झवेरी यांच्या एका सिनेमात आणि विक्रम बत्रा यांच्या बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे. विक्रम बत्रा बायोपिकचे तात्पुरते शीर्षक कारगील : शेरशाह असे ठेवण्यात आले असल्याचे समजते आहे. जबरिया जोडी सिनेमानंतर सिद्धार्थ विक्रम बत्रा बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. मात्र आता या प्लानमध्ये थोडा बदल झाला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या बायोपिकच्या चित्रीकरणाला पुढील वर्षी एप्रिल-मे पर्यंत सुरूवात होणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार काश्मीरमध्ये या बायोपिकचा मोठा हिस्सा शूट केला जाणार आहे. रेकीच्या दरम्यान निर्मात्यांना जाणवले की, जानेवारी-फेब्रुवारीच्या जवळपास काश्मीरमधील वातावरण चित्रीकरणासाठी योग्य नाही. त्यामुळे शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने ट्विटरवर या सिनेमाची घोषणा केली होती. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा डबल रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन व सब्बीर बॉक्सवाला एकत्र करणार आहेत. आता विक्रम बत्रा बायोपिकचे शूटिंग शेड्युल पुढे ढकलण्यात आले आहे तर या दरम्यान डिसेंबरमध्ये सिद्धार्थ तारा सुतारियासोबत मिलाप झवेरी यांच्या रिवेंज ड्रामावर आधारीत सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. ज्याचे चित्रीकरण २०१९पर्यंत पूर्ण होईल.

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रा