Join us

सिद्धार्थ आणि जान्हवीच्या 'परम सुंदरी'ला नवीन डेट, 'सैयारा'मुळे पुढे ढकलली होती रिलीजची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:16 IST

Param Sundari Movie : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर स्टारर बहुप्रतिक्षीत रोमँटिक कॉमेडी चित्रपट परम सुंदरीला नवीन रिलीज डेट मिळाली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) स्टारर बहुप्रतिक्षीत रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'परम सुंदरी'(Param Sundari Movie)ला नवीन रिलीज डेट मिळाली आहे. बऱ्याच काळापासून त्याच्या रिलीज डेटबद्दल सस्पेन्स होता आणि आता अखेर निर्मात्यांनी तारीख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एका नवीन मोशन पोस्टरद्वारे ही घोषणा करण्यात आली. मॅडॉक ऑफिसमध्ये दोन्ही कलाकारांना पाहिल्यावर नवीन प्रमोशनल व्हिडीओ शूट करण्यात आला. कॅप्शनमध्ये लिहिले होते, "वर्षाची सर्वात मोठी प्रेमकथा, दिनेश विजन आणि मॅडॉक फिल्म्स कडून, तुषार जलोटा दिग्दर्शित, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर अभिनीत, परम सुंदरी, २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे."

'परम सुंदरी' हा चित्रपट आधी २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'ला टक्कर देणार होता, जो त्याच दिवशी प्रदर्शित होत होता. मात्र, आता त्याचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले आहे. 'सैयारा' सिनेमाला मिळणारा रिस्पॉन्स पाहून 'परम सुंदरी' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते.नुकतेच सिनेमातील 'परदेसिया' चित्रपटाचे पहिले रोमँटिक गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. चाहते त्यावर हार्ट इमोजी बनवून प्रतिक्रिया देत आहेत. 'परम सुंदरी' या चित्रपटात उत्तर आणि दक्षिणेचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित परम सुंदरी आता २९ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तुषार जलोटा यांनी यापूर्वी अभिषेक बच्चन अभिनीत 'दसवी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सिद्धार्थ आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्र झळकणारसिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर ही नवीन जोडी पहिल्यांदाच 'परम सुंदरी' सिनेमात दिसणार आहे. येत्या काही दिवसांत ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याची गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

टॅग्स :जान्हवी कपूरसिद्धार्थ मल्होत्रा