Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:11 IST

सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सुरू केला नवा फूड व्यवसाय, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. सिद्धार्थ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून चाहत्यांना अपडेट्स देत असतो. नुकतंच सिद्धार्थने एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत सिद्धार्थने पोस्ट शेअर केली आहे. 

सीमा चांदेकर यांनी सीमा फूड्स नावाने पुण्यात स्वत:चं दुकान सुरू केलं आहे. या दुकानात सर्व घरगुती पदार्थ ग्राहकांना मिळणार आहेत. याआधी सीमा चांदेकर या दिवाळीत फराळाचे पदार्थ बनवून विकायच्या. आता त्यांनी मोठी झेप घेत स्वत:चं दुकान सुरू केलं आहे. सिद्धार्थने त्याच्या आईच्या दुकानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "नवीन बिज़नेस! नवीन innings! Proud of you आई. पुण्यात आरण्येश्वर चौकात माझ्या आईचं नवं दुकान! सर्व घरगुती गोष्टी. जरूर भेट द्या", असं कॅप्शन त्याने दिलं आहे. 

सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही कमेंट करत सीमा चांदेकर यांचं अभिनंदन केलं आहे. त्यासोबतच त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. सिद्धार्थची आई सीमा यादेखील एक अभिनेत्री आहेत. आईच्या पावलावर पाऊल टाकत सिद्धार्थने अभिनय क्षेत्रात नाव कमावलं. सिद्धार्थची आई सीमा यांनी अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. गेली कित्येक वर्ष त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेता