Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता तिवारीचे नाटक 'जब वी सेपरेटेड' लवकरच रंगभूमीवर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 19:32 IST

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे 'जब वी सेपरेटेड' हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे.

ठळक मुद्दे'जब वी सेपरेटेड' नाटक आधुनिक काळातील जोडप्यांवर आधारीत

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे 'जब वी सेपरेटेड' हे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन राकेश बेदी यांनी केले आहे. या नाटकात श्वेता तिवारीसोबत अभिनेता राहुल भुचार व राकेश बेदीदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचा नरीमन पॉइंट येथील एनसीपीए या ठिकाणी येत्या १० नोव्हेंबरला रात्री ८ वाजता प्रयोग पार पडणार आहे. 

'जब वी सेपरेटेड' हे नाटक आधुनिक काळातील जोडप्यांवर भाष्य करते व हल्ली नात्यात एकमेकांवर विश्वास नसतो आणि घटस्फोटाचा पर्याय वापरला जातो. या नाटकाबद्दल अभिनेता व दिग्दर्शक राकेश बेदी म्हणाले की, 'आपल्या समाजात घटस्फोट हा गंभीर मुद्दा बनला आहे आणि आम्ही या नाटकाच्या माध्यमातून प्रेमातील विश्वास,  दया वगैरे पाहायला मिळत नाही. कोर्ट नात्याला एक संधी म्हणून सहा महिन्याचा काळ देते. पण, त्यामुळे खरोखर नाते पूर्ववत होते का ? या सगळ्याची उत्तरे या नाटकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. '

'जब वी सेपरेटेड' नाटकाची कथा संजय साहनी व प्रिया महेश्वरी साहनी यांच्याभोवती फिरते. हे जोडपे मुंबईत राहत असतात. प्रियाला वाटते की तिचा नवरा तिला फसवतो आहे. तर संजयला वाटते की प्रिया त्याला वेळ देत नाही. ते घटस्फोटासाठी अर्ज करतात. कोर्ट त्यांना भांडण मिटवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी देते. ते दोघे नाते संपवण्यासाठी सहा महिने कधी संपतात याची वाट पाहत असतात. यावर आधारीत नाटकाचे कथानक आहे. 

टॅग्स :श्वेता तिवारीराकेश बेदी