Join us

पैशांसाठी आंधळा झाला होता श्वेता तिवारीचा नवरा राजा चौधरी, मुलगी पण झाली नकोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:13 IST

Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. पहिल्यांदा राजा चौधरी आणि नंतर अभिनवसोबतचे लग्न तुटल्यानंतर, श्वेता एकट्याने तिच्या दोन मुलांचे संगोपन करत आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. पहिल्यांदा राजा चौधरी आणि नंतर अभिनवसोबतचे लग्न तुटल्यानंतर, श्वेता एकट्याने तिच्या दोन मुलांचे संगोपन करत आहे. दरम्यान, एका मीडिया पोर्टलशी बोलताना श्वेताने तिचा एक्स पती राजा चौधरीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

१९९८ मध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीने राजा चौधरीशी लग्न केले. मात्र २०१२ मध्ये, अभिनेत्रीने राजावर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत घटस्फोट घेतला. श्वेता म्हणाली की राजा तिला खूप मारहाण करायचा. अलिकडेच श्वेता तिवारीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला की तिने राजाकडून पोटगी म्हणून एक पैसाही घेतला नव्हता. खरे तर, तिला तिची मुलगी पलक हिच्या ताब्यासाठी राजाला पैसे द्यावे लागले. 

मुलीच्या बदल्यात पहिल्या पतीनं अभिनेत्रीकडे मागितला फ्लॅट

एका मीडिया पोर्टलशी बोलताना श्वेता तिवारीने एक खुलासा केला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. घटस्फोटादरम्यान, मुलगी पलक मागण्याऐवजी, राजाने श्वेताकडे ९३ लाख रुपयांचा फ्लॅट मागितला होता. राजा चौधरीने सांगितले होते की, ती पलकला ठेवू शकते पण त्या बदल्यात त्याला फ्लॅट हवा आहे. मात्र, राजा चौधरीचा दावा आहे की, घटस्फोटानंतर श्वेताने त्याची सर्व कमाई काढून घेतली. राजा चौधरीशी घटस्फोट झाल्यानंतर श्वेता तिवारीने अभिनव कोहलीशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, ते लग्नही टिकले नाही आणि ती सिंगलच राहिली. सध्या ती दोन्ही मुलांचे संगोपन करते आहे. 

टॅग्स :श्वेता तिवारीपलक तिवारी