Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:34 IST

Shweta Tiwari : श्वेता तिवारीचा एक्स पती राजा चौधरीने पुन्हा एकदा अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. राजा म्हणाला की, श्वेता 'कसौटी जिंदगी की' दरम्यान त्याला मूर्ख बनवत असे. त्याने पुन्हा एकदा त्याची एक्स पत्नी श्वेता तिवारीवर अनेक आरोप केले आहेत.

श्वेता तिवारी(Shweta Tiwari)चा एक्स पती राजा चौधरीने पुन्हा एकदा अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. राजा म्हणाला की, श्वेता 'कसौटी जिंदगी की' दरम्यान त्याला मूर्ख बनवत असे. त्याने पुन्हा एकदा त्याची एक्स पत्नी श्वेता तिवारीवर अनेक आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत.

राजा चौधरीने अलीकडेच हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, श्वेता तिवारीने त्याला खूप त्रास दिला होता. तो म्हणाला की आमचा घटस्फोट खूप पूर्वी व्हायला हवा होता, पण त्या काळात मला हे समजले नाही. तो म्हणाला की श्वेताने मलाच नाही तर कुटुंबाला खूप दुःख दिले आहे. आमचा घटस्फोट २०१२ मध्ये नाही तर २००३ मध्ये व्हायला हवा होता. तो म्हणाला की ती शूटिंग सेटवर जात नव्हती. ती सकाळी घराबाहेर पडायची, पण सेटवर जात नव्हती.

अभिनेत्यासोबत कारमध्ये श्वेताला पाहिलं होतं राजानं

राजा चौधरीने सांगितले की, तो एकदा 'कसौटी जिंदगी के'च्या सेटवर श्वेताला भेटायला गेला होता, पण ती तिथे नव्हती. ती तिच्या घरून सेटवर निघून गेली होती. काही वेळाने मी श्वेताला सेझन खानच्या गाडीत पाहिले. सेझन आणि त्याचा ड्रायव्हर श्वेतासोबत गाडीत होता. सेझन खान आणि श्वेता यांना पाहून मी स्वतःला पटवून देत होतो की ते दोघीही सहकलाकार आहेत. अशा परिस्थितीत हे अगदी सामान्य आहे. मी श्वेताशी याबद्दल बोललो नाही. कारण मला माहित होते की श्वेता माझ्याशी भांडेल आणि म्हणेल की तू दारू प्यायला आहेस.

श्वेताने राजा आणि त्याच्या कुटुंबावर केले होते आरोप

राजा चौधरीने असाही दावा केला की जेव्हा जेव्हा तो श्वेताला काही विचारलं तर ती रागावायची. ती म्हणायची की मी कमावते. तू मला मारशील का? मला माहित नाही तिची मानसिकता काय होती. श्वेता पलकला माझ्या आईशी बोलू देत नव्हती. अनेकदा माझी आई म्हणायची की तिला पलकशी फोनवर बोलायचे आहे. जेव्हा श्वेता आई झाली तेव्हा ती मुलासह घराबाहेर पडली आणि नंतर मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. ती नेहमी म्हणायची की मी आणि माझे कुटुंब तिला त्रास देतो.

टॅग्स :श्वेता तिवारी