Join us

Bigg Boss 18: फिनालेआधीच या स्पर्धकाचं महाविजेता होण्याचं स्वप्न भंगलं, मीड वीक एविक्शनमधून घराबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:03 IST

Bigg Boss 18 ची सध्या चांगलीच चर्चा असून फिनालेला काहीच दिवस बाकी असताना हा स्पर्धक घराबाहेर गेला आहे

Bigg Boss 18 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. काहीच दिवसांमध्ये Bigg Boss 18 ची फिनाले रंगणार आहे. सध्या Bigg Boss 18 चा अखेरचा टप्पा सुरु आहे. सध्या घरात करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, रजत दलाल, श्रुतिका अर्जुन आणि ईशा सिंह हे स्पर्धक आहेत. यापैकी एका स्पर्धकाला मीड वीक एविक्शनमधून घराबाहेर जावं लागलं आहे. कोण आहे तो स्पर्धक जाणून घ्या?

हा स्पर्धक Bigg Boss 18 मधून गेला बाहेर?

या आठवड्यात टाइम काउंट या नॉमिनेशन टास्कमध्ये रजत दलाल, श्रुतिका अर्जुन आणि चाहत पांडे यांनी नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना नॉमिनेट व्हावं लागलं. मीडिया रिपोर्टनुसार, Bigg Boss 18 मधील स्ट्राँग स्पर्धक रजत दलाल मीड विक एविक्शनमधून घराबाहेर गेला अशी चर्चा होती. परंतु असं काही झालं नसून रजत या आठवड्यात सेफ आहे. परंतु सध्या घरात असलेल्या ९ स्पर्धकांपैकी चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन यापैकी एकीचा फिनालेआधीच Bigg Boss 18 मधील प्रवास संपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Bigg Boss 18 ची फिनाले कधी?

टेलिव्हिजनवरील गाजत असलेल्या Bigg Boss 18 ची फिनाले पुढील आठवड्यात रंगणार आहे. १९ जानेवारीला Bigg Boss 18 ची फिनाले रंगणार आहे. कलर्स टीव्हीवर ही फिनाले प्रेक्षकांना बघायला मिळेल. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या खास शैलीत Bigg Boss 18 ची फिनाले होस्ट करणार आहे. Bigg Boss 18 च्या फिनालेमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाची टीम सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :सलमान खानबिग बॉस