Join us

श्रृती मराठेचा घायाळ करणारा अंदाज, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 21:00 IST

तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून कपाळावर टिकली लावल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

छोटा पडदा असो किंवा मग मोठा पडदा  या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाने अभिनेत्री श्रृती मराठेने रसिकांची मने जिंकली आहेत. मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल. सोशल मीडियावर तिने स्वतःचा पिवळ्या रंगाची छटा असलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील श्रृतीचा लूक कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून कपाळावर टिकली लावल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने कॅप्शनही दिली आहे. थोडा वेगळा प्रयत्न केला आहे, जो नक्कीच तुम्हाला आवडेल अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली आहे. 

जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री श्रृती मराठे हिची पहिली आंतरराष्ट्रीय सहलीची आठवण सध्या सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरली आहे. श्रृतीसाठी तिची पहिली आंतरराष्ट्रीय सहल एक सरप्राईज होती. नववी पास झाल्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीत श्रृती आणि तिचे कुटुंबीय फिरायला जाणार होते. श्रृतीने कुठे जातो आहे असं विचारल्यावर तिच्या वडिलांनी तिला माऊंट अबू असं सांगितलं. माऊंट अबू ऐकताच श्रृती आणि तिची बहिण खूश झाली होती. मे महिना असतानाही तिने पिकनिकची तयारी करताना थंडीचे कपडे हट्टाने सोबत घेतले होते. 

या सहलीसाठी ते पुण्याहून मुंबईला आले होते. माऊंट अबूला ट्रेनने जाता येतं हे श्रृतीला माहिती होते. मात्र श्रृतीचे बाबा सगळ्यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहचले. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपण माऊंट अबूला नाही तर स्वित्झर्लंडला जात आहोत. हे ऐकताच श्रृती आणि तिची बहिण प्रीती यांना अक्षरक्षा आनंदाने रडूच कोसळलं. 

विमानात गेल्यावर सीटबेल्ट लावण्यापासूनची सगळी धम्माल श्रृतीने केली. शिवाय स्वित्झर्लंडमध्येही अनेक प्रकारचे चीज आणि चॉकलेट्स खाल्ल्याची आठवण श्रृतीच्या मनात घर करुन आहे. जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने श्रृतीच्या फॅन्सनी ही आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे.  

टॅग्स :श्रुती मराठे