Join us

क्वारांटाईन झालेल्या मराठी अभिनेत्री शेअर केला बालपणीचा फोटो, साऊथमध्ये ही आहे तिचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 17:55 IST

मराठीत प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

अभिनेत्री श्रुती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

 

श्रुतीने तिच्या लहानपणीचा बहिणीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत श्रुती खूपच क्युट दिसतेय. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. श्रुतीचा पती गौरव घाटणेकरही अभिनेता आहे.

टॅग्स :श्रुती मराठे