Join us

ही चिमुरडी करतेय आज मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य, दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 07:00 IST

या अभिनेत्रीला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. तिने मराठीसोबतच साउथच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. नुकताच श्रुतीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. जागतिक डान्स दिनानिमित्त शालेय जीवनातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पहिल्या कथ्थक परफॉर्मन्सचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा बालपणीचा फोटो पाहून तिला ओळखताही येत नाही. तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या या फोटोवर क्यूट अशी कमेंट होते आहे.

श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. 

श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे.

टॅग्स :श्रुती मराठेगौरव घाटणेकर