Join us
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे दिसायला श्रेया बुगडेची बहीण, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 12:21 IST

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी रिएलिटी शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचं अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं. श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. श्रेयाने अलीकडेच तिच्या बहिणीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. श्रेया बुगडेची मोठी बहीण तेजल ही देखील दिसायला तिच्या इतकीच सुंदर आहे.

 श्रेया आणि तेजलची चेहरेपट्टी अगदी सारखी असून त्यांच्या केवळ उंचीत फरक असल्याचे दिसून येते. श्रेया बहीण तेजलसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. या फोटोंमधून दोघींमधले बॉन्डिंग ही दिसून येते. श्रेयाने शेअर केलेल्या बहिणीसोबतच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचसोबत समुद्र या नाटकात ती एका गंभीर भूमिकेत दिसली होती. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.

टॅग्स :श्रेया बुगडे