Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाल्यावर याला झाला प्रेमरोग, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 13:01 IST

सोशल मीडियावर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व्यक्तीला प्रेमरोग होतो, हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो चला हवा येऊ द्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. नुकताच त्यांनी शेलिब्रेटी पॅटर्न सुरू केला आहे. यात विविध सेलिब्रेटी हजेरी लावताना पहायला मिळताहेत. या शेलिब्रेटी पॅटर्नला देखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो. या प्रोमोत नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना. 

शेलिब्रेटी पॅटर्नचा प्रोमो झी मराठी ऑफिशिएलच्या पेजवर शेअर करून म्हटलंय की, हॉस्पिस्टलमध्ये अ‍ॅडमिट झाल्यावर याला झाला प्रेमरोग. या प्रोमोमध्ये भालचंद्र उर्फ भाऊ कदम, श्रेया बुगडे व भारत गणेशपुरे स्कीट करताना दिसत आहेत. या व्हिडिओत भाऊ कदम रुग्ण तर श्रेया नर्स आणि भारत गणेशपुरे रुग्णाचे नातेवाईकाच्या भूमिकेत दिसत आहेत.

या स्कीटमध्ये भाऊ कदमचा अपघात होतो व त्याच्या डोक्याला दुखापत होते. त्याला हॉस्पिटलमध्ये भारत गणेशपुरे घेऊन येतात. नर्स रुग्णाच्या नातेवाईकाला औषध आणण्यास सांगते. त्यावर भाऊ त्याला लवकर येऊ नको असं सांगतो. औषधांचा कागद दिल्यावर नातेवाईक म्हणतो हा कागद आहे. त्यावर नर्स तुम्ही पण अपघात झाला तेव्हा तुम्हीपण सोबत होतात का? असं विचारते. तो म्हणतो नाही. तर नर्स बोलते की तुम्हीपण डोक्यावर पडल्यासारखेे वागत आहेत. औषध आणण्यासाठी नातेवाईक जातो. तो गेल्यावर चिट्टीत काय लिहिलं हे जाणून घेण्यासाठी रुग्ण उत्सुक होतो. त्यावर नर्स बोलते की त्या चिठ्ठीत लिहिलंय की या माणसाला औषध देऊ नाक हा वेडा आहे.

हॉस्पिटलच्या स्कीटचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या स्कीटला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून हसाल.

टॅग्स :चला हवा येऊ द्याझी मराठीभाऊ कदमश्रेया बुगडेभारत गणेशपुरे