Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आनंदम’मध्ये श्रेणु पारिख साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 19:58 IST

स्टार प्लस वाहिनीवर लवकरच ‘आनंदम’ ही नवीन मालिका दाखल होणार आहे आणि यात ‘इश्कबाज’मध्ये गौरी शर्माच्या रूपात दिसून आलेली श्रेणु पारिख परफेक्ट बहूच्या रूपात दिसणार आहे.

स्टार प्लस वाहिनीवर लवकरच ‘आनंदम’ ही नवीन मालिका दाखल होणार आहे आणि यात ‘इश्कबाज’मध्ये गौरी शर्माच्या रूपात दिसून आलेली श्रेणु पारिख परफेक्ट बहूच्या रूपात दिसणार आहे.

श्रेणु पारिख ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक असून तिने सांगितले की, “बढो बहूच्या निर्मात्या दिप्ती कलवानी यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यांच्या ह्या विकसनशील शोप्रमाणे हा नवीन शो सुद्धा वेगळा आणि अपारंपारिक असा फॅमिली ड्रामा असेल. मी यात परफेक्ट बहूची भूमिका करत आहे.” 

श्रेणुने पुढे सांगितले की, “आम्ही या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात केली असून ही कथा आहे एका मारवाडी परिवार आणि त्यांच्या जीवन प्रवासातील चढउतारांची. माझी व्यक्तिरेखा जान्हवी ही अख्ख्या परिवाराला एकत्र बांधून ठेवते आणि आपल्या प्रियजनांसाठी ती काहीही करू शकते.”

‘आनंदम’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :स्टार प्लसइश्कबाज मालिका