Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा कपूरचा भाऊ अभिनेता सिद्धांतला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 20:08 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा अभिनेता सिद्धांत कपूरला कोरोनाची लागण झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा अभिनेता सिद्धांत कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तो गोव्यात होता. तिथेच त्याने कोरोनाची टेस्ट केली होती ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

अभिनेते शक्ती कपूर यांनी याआधीच सांगितले होते की, माझ्या मुलाला कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. मीडिया रिपोर्टनुसारआता खुद्द सिद्धांतनेच कन्फर्म केले आहे की, त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

एका इंग्रजी न्यूजपेपरच्या रिपोर्टनुसार, सिद्धात कपूरने सांगितले की, रविवारच्या आसपास माझी टेस्ट सेन्स गेली होती. मला वाटले की, मी टेस्ट करायला पाहिजे. मी गोव्यात आहे. इथे आमचे एक घर आहे. देवाची कृपा आहे की मी मुंबईच्या गर्दीत किंवा ट्राफिकमध्ये नाही. मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. मला वाटते की, काही दिवसात मी बरा होईन.

सिद्धांत कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो भूत पार्ट वन : द हॉन्टेड शिप या चित्रपटात शेवटचा दिसला होता. लवकरच तो अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या सोबत चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट जुलै २०२० मध्ये रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूरकोरोना वायरस बातम्या