Join us
Daily Top 2Weekly Top 5

पापा शक्ती कपूर यांच्या चित्रपटाचा बोल्ड ट्रेलरमुळे ट्रोल झाली श्रद्धा कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 17:54 IST

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर सध्या त्यांच्या एका आगामी सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे, ‘द जर्नी आॅफ कर्मा’. 

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर सध्या त्यांच्या एका आगामी सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे, ‘द जर्नी आॅफ कर्मा’. या चित्रपटात शक्ती कपूर बॉलिवूडची सर्वाधिक बोल्ड बाला पूनम पांडेसोबत दिसणार आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये शक्ती कपूर पूनम पांडेसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसत आहेत. हा ट्रेलर इतका बोल्ड आहे की, या ट्रेलरवरून शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर हिला ट्रोल केले जात आहे.

पूनम पांडे आणि शक्ती कपूरची हॉट केमिस्ट्री पाहून ट्रोलर्सने श्रद्धाला टॅग करून ट्रोल करण्याचा सपाटा लावला आहे. ‘श्रद्धा कपूर, तुला पापा शक्ती कपूरच्या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला,’ असा खोचक प्रश्न एका ट्रोलरने केला आहे.

अन्य एका युजरने शक्ती कपूर यांना टॅग करत, तुझ्या मुलीने हा ट्रेलर पाहिलायं का? असा सवाल केला आहे. इतकेच नाही तर अनेक युजर्सनी श्रद्धा व शक्ती कपूर यांच्याविरोधात अश्लिल कमेंट्स केले आहेत. अद्याप श्रद्धा व शक्ती कपूर यांनी या ट्रोलिंगला काहीही उत्तर दिलेले नाही.

‘द जर्नी आॅफ कर्मा’चा ट्रेलर आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. शिवेंद्र दहिया दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २६ आॅक्टोबरला रिलीज होत आहे.अलीकडे शक्ती कपूर या चित्रपटांवर बोलले होते. हा चित्रपट भजनसम्राट अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या रिलेशनशिपवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

टॅग्स :श्रद्धा कपूरशक्ती कपूरपूनम पांडे