Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे 'या' अभिनेत्रीला मिळाला होता ब्रेक, आज आहे आघाडीची नायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 11:14 IST

सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुलांनी सिनेमात एंट्री केली आहे. पण एक अभिनेत्री अशीही आहे जिने सिनेमात एंट्री केल्यानंतर रसिकांना ही कोणाची मुलगी आहे याची ओळख पटली. 

हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांची मुलं आणि मुली आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावतात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत ही परंपरा सुरु आहे. आपल्या घरात सुरु असलेला अभिनयाचा वारसा दिग्गज कलाकारांची मुलं मुली पुढे नेत असतात. सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुलांनी सिनेमात एंट्री केली आहे. पण एक अभिनेत्री अशीही आहे जिने सिनेमात एंट्री केल्यानंतर रसिकांना ही कोणाची मुलगी आहे याची ओळख पटली. 

 

ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे श्रद्धा कपूर. शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर आज तिच्या वडिलांमुळे नाही तर तिच्या कर्तुत्वाने ओळखली जाते. श्रद्धा कपूरने नेहमीप्रमाणे तिचे काही फोटोशूट फेसबुकवर शेअर केले होते. तिचे फोटो एका निर्मात्याला इतके काही आवडले की, त्याने श्रद्धाचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी शक्ती कपूरची ती मुलगी असल्याचे अभिनेत्याला कल्पना नव्हती. मात्र शोध घेतल्यानंतर काही दिवसांनी त्याला शक्ती कपूरशी श्रद्धाचे कनेक्शन असल्याचे कळाले होते. 

आज स्टारकिडसना सिनेमात झळकण्यापूर्वीच त्यांच्या आई वडिलांचा लोकप्रियतेचा फायदा होतो. मात्र श्रद्धाने स्वबळावर स्वतःला सिद्ध केले. त्यामुळे स्टारकिडस हा प्रकार त्यावेळी नव्हता असेही तिने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.  त्यामुळे कुणाचंही नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

बॉलिवूडच्या ऑनस्क्रीन पसंत केल्या जाणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणून श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांना मानले जाते. ‘बागी’ च्या पहिल्या भागात ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा बागी ३मधून ही जोडी भेटीला येणार आहे. पण, आता मात्र श्रद्धा कपूर हिने एक वेगळीच इच्छा बोलून दाखवलीय. ती म्हणजे श्रद्धाला टायगर श्रॉफसोबत कॉमेडी चित्रपटात काम करायचेय.

टॅग्स :श्रद्धा कपूरबागी ३