Join us

थँक गॉड, मैं बच गई! ‘साहो’च्या सेटवर थोडक्यात बचावली श्रद्धा कपूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 19:17 IST

बहुप्रतिक्षीत ‘साहो’ या चित्रपटातही श्रद्धा झळकणार आहे. या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात ‘बाहुबली’ प्रभास तिचा हिरो आहे. ‘

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला सध्या जराही उसंत नाही. एकापाठोपाठ एक असे तिचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.  लवकरच श्रद्धाचा ‘स्त्री’ रिलीज होतोय. यानंतर ‘बत्ती गुल मीटर चालू’ प्रदर्शित होतोय. यानंतर बहुप्रतिक्षीत ‘साहो’ या चित्रपटातही श्रद्धा झळकणार आहे. या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात ‘बाहुबली’ प्रभास तिचा हिरो आहे. ‘बाहुबली2’नंतर प्रभास हा पहिला चित्रपट असल्याने चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटाची सगळ्यांत जमेची बाजू म्हणजे, यातील अ‍ॅक्शन दृश्ये असतील, असा दावा मेकर्सकडून केला जात आहे. या अ‍ॅक्शन दृश्यांसाठी हॉलिवूडचे खास स्टंट कोरिओग्राफर बोलवण्यात आले आहेत. तूर्तास ‘साहो’तील याच अ‍ॅक्शनदृश्यांबद्दल एक बातमी आहे.

 होय, ‘साहो’ एक अ‍ॅक्शन सीन करताना श्रद्धा कपूर थोडक्यात बचावली. एका मुलाखतीत श्रद्धाने स्वत: या वृत्तास दुजोरा दिला. ‘साहो’चे शूटींग करताना मज्जा आली. पण एक अ‍ॅक्शन दृश्य करताना मोठा अपघात झाला आणि मी केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचले. या अपघातात माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. साऊथमध्ये शूटींग करताना सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. पण स्वत:चे स्टंट स्वत: करण्याच्या नादात अनेकदा स्वत:च्या जीवावर बेतणारी चूक होते आणि मग ती भारी पडते, असे श्रद्धा म्हणाली.‘साहो’मध्ये श्रद्धा व प्रभासशिवाय नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे कलाकार आहेत.

'साहो’मध्ये  श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही ती दिसणार आहे. एमी जैक्सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तव सारखे कलाकारही दिसणार आहेत. प्रभासचा हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीत तयार होत आहे. रामोजी फिल्म सिटीत ‘साहो’चे बहुतांश शूटींग झाले. सूत्रांचे खरे मानाल तर, ‘साहो’मध्ये स्वातंत्र्याचीपूर्वीची कथा आहे. चित्रपटात ब्रिटीश काळ दाखवला आहे. चित्रपटात सर्वत्र ब्रिटीश झेंडे दिसतील. मैदानावर शंभरावर घोडे दौडताना दिसतील. इतकेच नाही तर चित्रपटातील पात्र पोलो गेम खेळतानाही दिसतील. यातील पात्र राजा-महाराजांप्रमाणे रॉयल कुर्ता-पायजामा तर ब्रिटीश इंग्रज खाकी रंगाच्या युनिफॉर्ममध्ये असतील.

टॅग्स :श्रद्धा कपूर