Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूमी पेडणेकर आणि राजकुमार रावचा आगामी चित्रपट 'बधाई दो'चे संपले शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 20:59 IST

भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांनी त्यांच्या आगामी 'बधाई दो' चे शूटिंग संपवले आहे.

भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांनी त्यांच्या आगामी 'बधाई दो' चे शूटिंग संपवले आहे. 'बधाई दो'मध्ये भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. भूमी पेडणेकरने इंस्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये राजकुमार राव आणि डायरेक्‍टर हर्षवर्धन कुलकर्णीबरोबरचे दोन फोटो पोस्ट केले आणि 'बधाई दो'चे शूटिंग संपल्याचे सांगितले आहे,

भूमी पेडणेकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर राजकुमार राव आणि हर्षवर्धन कुलकर्णीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, शार्दुल आणि सुमीचे शूटिंग संपले आहे.  या शूटिंगदरम्यान आम्ही काय धमाल केली, हे कधीही विसरू शकणार नाही. सतत हास्यविनोद आणि एकमेकांची चेष्टा मस्करी चालली होती.

'बधाई दो' हा आयुष्मान खुरानाच्या 'बधाई हो'चा सिक्वेल आहे. त्याचीच हसवणूक या सिक्‍वेलमध्येही कायम राहणार आहे. जोडीला राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर हे नवीन कॉम्बिनेशन असणार आहे.

बधाई दो या सिनेमात राजकुमार राव एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. एक असा पोलीस अधिकारी ज्याची ड्यूटी महिला पोलिस ठाण्यात लागते. भूमी या सिनेमात पीटी शिक्षिका दाखवण्यात आली आहे. भूमी पेडणेकर व राजकुमार राव पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे. 'बधाई हो'ला अपारंपरिक कथाबीज श्रेणीमध्ये २०१९ सालचा सर्वोत्कृष्ठ सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. सिक्‍वेल असल्याप्रमाणेच 'बधाई दो' हा एक फॅमिली कॉमेडी ड्रामा असणार आहे.

'बधाई हो' आणि 'बधाई दो' हे दोन्ही फॅमिली कॉमेडी ड्रामा आहेत, हा एवढाच दोन्हीमध्ये समान धागा आहे. पण सिक्‍वेलची कथा प्रिक्वेलपेक्षा पूर्ण वेगळी असणार आहे.

टॅग्स :भूमी पेडणेकर राजकुमार राव