Join us

धक्कादायक! 'टॅलेंटऐवजी या गोष्टींना देतात महत्त्व', अभिजीत सावंतनं रिअ‍ॅलिटी शोची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 13:37 IST

अभिजीत सावंतने एका मुलाखतीत सध्याच्या रिअ‍ॅलिटी शोचा पर्दाफाश केला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन सातत्याने चर्चेत येतो आहे. शोमधील कॉन्ट्रोव्हर्सी, कंटेस्टंटचे लव्ह अफेयर्स मुळे चर्चेत येत आहे. नुकतेच इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने रिएलिटी शोवरील नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर त्याने  सीझन ११मध्ये झालेल्या कित्येक गोष्टी खोट्या असल्याचं म्हणत रिएलिटी शोचा पर्दाफाश केला आहे.

बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंतने शोमध्ये सामिल केल्या जाणाऱ्या एक्स्ट्रा एलिमेंटवर वक्तव्य केले. तो म्हणाला की, शोमध्ये कंटेस्टंटच्या परफॉर्फन्सवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी दुसरीकडे भरकटताना दिसते आहे. आमच्या वेळी दुसऱ्या गोष्टींना कमी प्राधान्य दिले जात होते मात्र आज या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाते. जेव्हा तुम्ही इतर गोष्टींना जास्त महत्त्व देता तेव्हा सिंगिंगची पातळी घसरते. ही सर्वात मोठी समस्या आहे. आपल्याला सिंगिगवर जास्त वेळ दिला पाहिजे.अभिजीत सावंतने इंडियन आयडॉलच्या निर्मात्यांना म्हटले होते की, कंटेस्टंटची ट्रॅजिक स्टोरीऐवजी गायनावर फोकस केले जाते. हल्ली निर्माते स्पर्धकांच्या टॅलेंटपेक्षा जास्त त्यांच्या स्टोरीवर लक्ष केंद्रीत करतात की तो किती गरीब आहे किंवा हा शूज पॉलिश करतो. प्रेक्षकांबाबत अभिजीत सावंतने म्हटले होते की, प्रेक्षकांना ड्रामा खूप आवडतो. त्यामुळेच निर्माते प्रेक्षकांना अवाक करण्याचा प्रयत्न करतात.

अभिजीत सावंतने शोमधील लव्ह अफेअर्सच्या मुद्द्यावरही निशाणा साधला. तो म्हणाला की, याप्रकारचे प्रत्येक एलिमेंट सीझन ११मध्येही बनावटी होते. मला या सीझनची तितकी आयडिया नाही. अभिजीतने नेहा कक्कर आणि आदित्य नारायणच्या लग्नाच्या अँगलवर म्हटले की, आपल्याला अशाप्रकारच्या क्रिएटिव्ह आयडियांना सिगिंगसोबत बॅलेंस केले पाहिजे. आपल्याला सिंगिगमुळे प्रसिद्ध व्हायचे आहे ना की या स्टोरींंमुळे.

किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी काही दिवसांपूर्वी इंडियान आयडॉल १२मध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी शोवर कमेंट केली होती. त्यांच्या या कमेंटवर अभिजीत सावंतने टीका केली होती. तो म्हणाला होता की, अमित कुमार यांनी नवीन गायकांची तुलना किशोर कुमार यांच्यासोबत केली नाही पाहिजे.

टॅग्स :अभिजीत सावंतइंडियन आयडॉल