Join us

जेव्हा मनोज बाजपेयी यांच्यावर मुलींच्या वॉशरुममध्ये लपून बसण्याची आली होती वेळ, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 16:27 IST

मनोज बाजपेयी लवकरच 'डायल १००' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमामुळे तो फार चर्चेत आहे. यात त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री साक्षी तन्वरनं साकारली आहे.

मनोज बाजपेयी हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. गेल्या काही वर्षात मनोज बाजपेयीने एक से बढकर एक प्रोजेक्टमध्ये काम करत रसिकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे जगभरात त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मनोज बाजपेयीने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.मनोज बाजपेयी लवकरच 'डायल १००' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमामुळे तो फार चर्चेत आहे. यात त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री साक्षी तन्वरनं साकारली आहे. नुकत्याच  दिलेल्या मुलाखतीत मनोज बायपेयीने सिनेमाव्यतिरिक्त त्याच्यासोबत घडलेला एक मजेदार किस्सा सांगितला. 

साक्षी तन्वरला मनोज बाजपेयी यांनीच अभिनयाचे धडे दिले आहेत. याचदरम्यानचा एक किस्सा त्यांच्यासोबत घडला होता. जेव्हा मनोज बाजपेयी साक्षीला अभिनय शिकवत होते. लेडी श्री राम कॉलेजमध्ये त्यावेळी त्यांना जावे लागायचे. हे गर्ल्स कॉलेज होते. मनोज बाजपेयींचा स्वभाव अतिशय लाजाळु. त्यामुळे मुली समोर  जरी आल्या तरी ते प्रचंड लाजायचे. अशात त्यावेळी त्यांना मुलींच्या कॉलेजमध्ये जाणे खूप मोठे आव्हान होते. 

यातून त्यांनी एक पर्याय शोधून काढला होता. कॉलेजच्या गेटवरच त्यांनी विद्यार्थिंनींना वाट पाहायला सांगायचे. एकदा असेच कॉलेजमध्ये  मुलींच्या वॉशरुममध्ये गेले आणि जेव्हा मनोज बाजपेयी त्या वॉशरुममध्ये होते. तेवढ्यात काही मुली वॉशरुममध्ये आल्या आणि त्या बराच वेळ तिथं होत्या. त्यामुळे मुलींसमोर कसे येणार म्हणून आतमध्येच लपून बसावं लागल्याचं त्यांनी सांगितले होते. सगळ्या मुली जेव्हा बाहेर गेल्या त्यानंतर मनोज बाजपेयी त्या वॉशरुममधून बाहेर आले होते.

मनोज बाजपेयी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आगामी काळात 'हंगामा है क्यों बरपा' या सिनेमात झळकणार आहेत.नुकतेच 'सायलेन्स' सिनेमात झळकले होते. तसेच 'द फॅमिली मॅन २' मधील भूमिकाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती.

टॅग्स :मनोज वाजपेयी