Join us

धक्कादायक! मृणाल ठाकूरला दुखापत, शूटिंग करताना कपाळावर जखम झाली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:21 IST

अभिनेत्री मृणाल ठाकूरला दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिची चांगलीच काळजी वाटली आहे

मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ‘डकैत’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अदिवि शेष आणि अभिनेत्री मृणाल ठाकुर जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये एका मोठ्या अ‍ॅक्शन सीनचे चित्रीकरण सुरू असताना ही घटना घडली. हे सीन अतिशय थरारक आणि धोकादायक होते, त्यामुळे शूटिंगदरम्यान दोघांनाही दुखापत झाली. या बातमीमुळे मृणालच्या चाहत्यांना तिची चांगलीच काळजी वाटली आहे. काय घडलं नेमकं?

अशी झाली मृणाल ठाकूरला दुखापत

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अदिवि शेषला शरीरावर आणि मृणाल ठाकूरला कपाळावर थोडी जखम झाली. मात्र ही दुखापत गंभीर नसल्यामुळे त्यांनी लगेच प्राथमिक उपचार घेतले आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. दोन्ही अभिनेत्यांचं हे प्रोफेशनल वागणं आणि कामाप्रती असलेलं समर्पण पाहून संपूर्ण टीमने त्यांचं कौतुक केलं. ‘डकैत: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक शेनिल देव करत आहेत. हा चित्रपट अ‍ॅक्शन आणि प्रेमकथा बघायला मिळणार आहे. अदिवि शेष आणि मृणाल ठाकूर यात प्रमुख भूमिका साकारत असून एक थरारक कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

कधी रिलीज होणार ‘डकैत’?

‘डकैत’ या चित्रपटाचं शूटिंग सध्या जोरात सुरू आहे आणि येत्या ख्रिसमस म्हणजेच २५ डिसेंबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट निर्मात्यांनी दिली आहे. मृणाल ठाकूर सध्या एकामागोमाग एक सिनेमे करताना दिसतेय. लवकरच मृणाल ठाकूर-अजय देवगण या जोडीचा 'सन ऑफ सरदार २' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती अभिनेता अदिवी शेष सोबत 'डकैत' सिनेमात काम करत आहे.

टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडमराठी अभिनेता