Join us

Shocking! चालत्या गाडीतून पडून १६ वर्षीय अभिनेत्याचं दुःखद निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:33 IST

Shocking! चालत्या गाडीतून पडून अभिनेत्याचं निधन, अवघ्या १६व्या वर्षी मृत्यूने गाठलं

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचं अवघ्या १६व्या वर्षी निधन झालं आहे. हडसन मीक असं या अभिनेत्याचं नाव असून त्याचं अपघाती निधन झालं आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हडसन मीकच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंवरुन त्याच्या निधनाबाबत पोस्ट करण्यात आली आहे. 

"आज रात्री हडसन मीकला देवाज्ञा झाली, हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे. या पृथ्वीवर तो फक्त १६ वर्ष होता. खूप कमी वेळातही त्याने खूप काही साध्य केलं. तो ज्या व्यक्तींना भेटला त्यांच्यावर त्याने प्रभाव टाकला. या दु:खातून सावरण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला बळ ", असं म्हणत हडसन मीकच्या निधनावर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. 

गुरुवारी, १९ डिसेंबरला हडसन मीकचा अपघात झाला होता. या अपघातात तो चालत्या गाडीतून खाली पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. २१ डिसेंबरला रात्री डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

बेबी ड्रायव्हर या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातून त्याला प्रसिद्ध मिळाली होती. 'MacGyver', 'लेगेसीज', 'फाऊंड' आणि 'जीनियस' सारख्या टीव्ही शोमध्येही त्याने काम केलं होतं. त्याच्या पश्चात आई-वडील, आणि भाऊ असं कुटुंब आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यूहॉलिवूड