Join us

Video: ढालेपाटलांच्या सूनांचा राडा! एकाच बीटवर तिघींनी केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:30 IST

Shivani sonar: या मालिकेत ढालेपाटलांच्या सुनांचं एकमेकींसोबत फारसं पटत नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र, ऑफस्क्रीन या सगळ्यांमध्ये कमालीची बॉण्डिंग आहे.

कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी एक आहे. उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. यामध्येच या मालिकेतील बरेचसे कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर मालिकेसंदर्भात किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात संजूने म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत.

या मालिकेत ढालेपाटलांच्या सुनांचं एकमेकींसोबत फारसं पटत नसल्याचं पाहायला मिळतं. मात्र, ऑफस्क्रीन या सगळ्यांमध्ये कमालीची बॉण्डिंग आहे. हेच मैत्रीच नातं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ढालेपाटलांच्या तीनही सुना एकाच बीटवर डान्स करत असून त्यांनी या गाण्याला मराठी तडका दिला आहे. या व्हिडीओमध्ये शिवानीसह श्रुती अत्रे (Shruti Atre), ऐश्वर्या शिंदे (Aishwarya Shinde) दिसून येत आहेत. 

दरम्यान, पडद्यामागे मज्जा करणाऱ्या या कलाकारांच्या मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. नुकतीच संजीवनीने एका गुन्हेगाराला बेदम मारहाण केली. ज्यामुळे रणजीत तिला सक्तीच्या रजेवर पाठवतो. त्यामुळे आता या मालिकेत काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठऱणार आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार