Join us

शिवानी या' सणाची आतुरतेने बघते' वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 06:30 IST

शिवानी बावकर म्हणजे लगीरं झालं जी मधील शीतल म्हणाली, "ललितपंचमीला माझी आई कुमारिका आणि सवाशीण बायकांची पूजा करते. घरी देवीला रोज नैवेद्य दाखवला जातो

ठळक मुद्देशिवानी लवकरच 'युथट्युब' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे

शिवानी बावकर म्हणजे लगीरं झालं जी मधील शीतल म्हणाली, "ललितपंचमीला माझी आई कुमारिका आणि सवाशीण बायकांची पूजा करते. घरी देवीला रोज नैवेद्य दाखवला जातो. माझी आई नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करते. मी नवरात्रीत बाहेर जाताना नेहमी त्या दिवशी असलेल्या रंगाचे कपडे परिधान करते. शिवाजी पार्क मध्ये ज्या देवीची स्थापना होते तिथे आणि माहीमच्या शीतलादेवीच्या दर्शनाला मी प्रत्येक वर्षी जायचे. तिथल्या एक्झिबिशनमध्ये देखील आम्ही जायचो. लहानपणी नवरात्र साजरी केल्याच्या या आठवणी मी जपून ठेवल्या आहेत. लहानपणी मी जिथे राहायचे त्या एरियामध्ये आम्हाला कुमारिका म्हणून पुजायला बोलवायचे तेव्हा मी आणि माझी मैत्रीण आम्ही ट्युशनला दांडी मारून तिकडे जायचो कारण मला पूजा करून घ्यायला खूप मजा वाटायची. घरी क्लास बुडवल्याची कबुली पण द्यायचे पण आई त्यासाठी ओरडायची नाही. मी नेहमीच या सणाची आतुरतेने वाट पाहते. सध्या शूटिंगमुळे घरापासून लांब असल्यामुळे मला नवरात्र साजरी करता येत नाही पण आम्ही जिथे शूट करतो त्या गावात नवलाई देवी जागृत आहे असं म्हणतात आणि त्या गावात त्या देवीचं वैशिष्ट्य आहे म्हणून आम्ही संपूर्ण टीम नवरात्रीत त्या देवीचा दर्शनाला न चुकता जातो."

शिवानी लवकरच 'युथट्युब' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. युथट्युब' चित्रपटाचे नाव ऐकताच हा तरूणाईवर आधारीत चित्रपट असल्याचे वाटते. हो, हा सिनेमा तरूणाई व सोशल मीडियावर आधारीत आहे. तरूणाईचे सोशल मीडियासोबत वेगळे नाते तयार झाले आहे. या नात्यावर आधारीत 'युथट्यूब' हा चित्रपट आहे.

टॅग्स :लागिरं झालं जी