Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवानी बदोनीला सध्या 'ह्या' गोष्टीवर करायचंय लक्ष केंद्रीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 07:15 IST

सोनी सबवरील नवीन मालिका 'बावले उतावले'मध्‍ये अभिनेत्री शिवानी बदोनी फुंटीची मुख्‍य भूमिका साकारत आहे.

सोनी सबवरील नवीन मालिका 'बावले उतावले'मध्‍ये अभिनेत्री शिवानी बदोनी फुंटीची मुख्‍य भूमिका साकारत आहे. फुंटी ही तरूण मुलगी तिच्‍या जोडीदाराचा शोध घेत त्‍याच्‍यासोबत विवाह करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. ती मधुचंद्राच्या बेडरूममध्‍ये गुड्डू (पारस अरोरा) या तरुणाला भेटते आणि तेथूनच कथेला नवीन वळण मिळते.

वास्‍तविक जीवनात विवाह करण्‍याबाबत विचारले असता शिवानीने इतक्‍या लवकर विवाह करण्‍याबाबत कोणताच विचार नसल्‍याचे सांगितले. ती सध्‍या तिच्‍या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि तिला करिअरमध्‍ये अधिकाधिक प्रगती करायची आहे. ती तिच्‍या आईवडिलांची खूपच लाडकी आहे. तिच्‍या आई वडिलांनी जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी प्रत्‍येक पायरीवर तिला पाठिंबा दिला आहे.

लव्‍ह मॅरेज की अरेंज मॅरेजला पसंती देईल, याबाबत विचारले असता शिवानी म्‍हणाली, 'मला लव्‍ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज करण्‍याबाबत काहीच हरकत नाही. पण त्‍यासाठी माझ्या वडिलांनी होकार दिला पाहिजे. शेवटी विवाह हा फक्‍त दोन व्‍यक्‍तींनाच नव्‍हे तर दोन कुटुंबांना देखील जोडतो. मी माझ्या कुटुंबाची खूप लाडकी आहे. म्‍हणूनच अशा गोष्‍टींसाठी माझ्या वडिलांचा होकार अत्‍यंत महत्‍त्‍वाचा आहे. माझ्या कुटुंबाने माझ्या वैयक्तिक, तसेच व्‍यावसायिक जीवनाशी संबंधित प्रत्‍येक निर्णयांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. मला खात्री आहे की, पुढे देखील ते मला पाठिंबा देतील. पण मी प्रेम करत असलेल्‍या मुलाला माझ्या वडिलांनी नकार दिला, तर मी त्‍यांना समजावण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करेन आणि त्‍यानंतरच त्‍याच्‍यासोबत विवाह करेन.'

टॅग्स :सोनी सब