Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिव ठाकरेने 'या' खास व्यक्तीबरोबर पाहिला ताजमहल, शेअर केले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:02 IST

शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

शिव ठाकरे (Shiv Thakare) हा एक लोकप्रिय अभिनेता आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शिव ठाकरे  नेहमीच प्रेक्षकांच्या संपर्कात असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो व व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. अनेकदा तो त्याच्या घरच्यांबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आताही त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

शिव ठाकरे आपल्या कुटुबांसोबत थेट आग्रामधील ताजमहल येथे पोहचलाय. त्याने इस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याची आई, बाबा आणि आजी दिसून येत आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं "मेरी जान तू ही थी तू ही है ये सांसें क्या सांसें इनका आना जाना यूं ही है" हे गाण्याचे बोल लिहले आहेत. शिवच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय. 

शिवचा त्याच्या आजीवर आणि कुटुंबावर प्रचंड जीव आहे. मुळचा अमरावतीचा असलेला शिव हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तो  प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मातीशी नाळ जोडून आहे. यामुळे चाहते त्याचं विशेष कौतुक करतात. 

शिव ठाकरेने आतापर्यंत विविध रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. 'बिग बॉस हिंदी'च्या १६व्या पर्वात तो उपविजेता ठरला. 'खतरों के खिलाडी' या रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील तो फायनलिस्टपैकी एक होता. याशिवाय तो काही म्युझिक व्हिडीओंमध्येदेखील दिसला आहे. 

टॅग्स :शीव ठाकरेताजमहाल