Join us
Daily Top 2Weekly Top 5

शीतली उर्फ शिवानी बावकर 'या' नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:15 IST

‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे शिवानी घराघरात पोहोचली. आता ती नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..

‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे शिवानी घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. इतकी की, मालिका संपली पण आजही प्रेक्षक शिवानीला शितली या नावानेच ओळखतात. आता शिवानी बावकर नवीन मालिकेतून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे नाव कुसुम आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 

कुसुम मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या मालिकेत ती शिवानी सासर आणि महेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

कुसुमच्या प्रोमोत लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा 'बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे', असं सांगते. त्यावर 'अजूनही तूच करतेस त्या घरचं?' असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, 'सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का?'सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली  वाटते. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिवानी बावकरने अभिनय क्षेत्रात येण्याआधी जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती. ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाड आणि बिनधास्तपणे बोलू शकते.

टॅग्स :शिवानी बावकर