Bigg Boss 18 ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. येत्या रविवारी १९ जानेवारीला Bigg Boss 18 ची फायनल रंगणार आहे. पण फिनालेआधीच Bigg Boss 18 मधील आणखी एका स्पर्धकाचा प्रवास संपलाय. या आठवड्यात टॉप ७ स्पर्धकांमध्ये विवियन डीसेना, चुम दुरांग, शिल्पा शिरोडकर, ईशा सिंह,रजत दलाल, अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा हे सात जण नॉमिनेट होते. त्यापैकी शिल्पा शिरोडकरचा Bigg Boss 18 प्रवास संपला आहे.
Bigg Boss 18 मधून शिल्पा शिरोडकर बाहेर
शिल्पा शिरोडकरला फिनालेपर्यंत पोहोचवण्यासाठी तिची बहीण आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने चाहत्यांना वोट करण्यासाठी अपील केलं होतं. परंतु फिनालेला काहीच दिवस बाकी असताना शिल्पा शिरोडकरचा Bigg Boss 18 मधील प्रवास संपला आहे. त्यामुळे आता फिनालेसाठी विवियन डीसेना, चुम दुरांग, ईशा सिंह,रजत दलाल, अविनाश मिश्रा, करणवीर मेहरा हे टॉप ६ स्पर्धक राहिले आहेत.
Bigg Boss 18 फिनाले कधी अन् किती वाजता?
बिग बॉस १८च्या ग्रँड फिनालेसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. निर्मात्यांनी काहीच दिवसांपूर्वी नवीन प्रोमो जारी केला आहे. यात शोच्या ग्रँड फिनालेची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. रिलीज केलेल्या प्रोमोनुसार, बिग बॉस १८चा शेवटचा भाग १९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जाईल. याशिवाय विजेत्याला ५० लाखांची रक्कम मिळणार आहे. यावेळी सलमान खान कोणत्या स्पर्धकाची निवड करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.