Join us

Video : ये आधा टकला क्यों? शिल्पा शेट्टीचा ‘अंडरकट बज कट’ पाहून नेटकरी शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 17:47 IST

Shilpa Shetty new hairstyle : नुकताच शिल्पा शेट्टीने एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. कारण शिल्पाची नवी हेअरस्टाईल.

ठळक मुद्देआधे सिर का क्या कुसूर था, अशी मजेशीर कमेंट अन्य एका युजरने केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) काही दिवसांपूर्वी नव-याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत होती. आता ती चर्चेत आहे ती तिच्या हेअरस्टाईलमुळे (Shilpa Shetty new hairstyle). होय, पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर पुढचे काही दिवस शिल्पा सोशल मीडियावरून पुरती गायब झाली होती. पण आता ती पुन्हा सोशल मीडियावर परतली आहे. नुसती परतली नाही तर चांगलीच सक्रीय झाली आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. कारण शिल्पाची नवी हेअरस्टाईल.

होय, शिल्पाने ‘अंडरकट बज कट’ केला आहे. तिचा हा हेअरकट सध्या चांगलाच चर्चेत आहे. व्हिडीओ जिमधील आहे. व्हिडीओत शिल्पा पाठमोरी उभी होऊन केस बांधताना दिसते आणि यादरम्यान तिचा नवा हेअरकट दिसतो. अर्थात हा हेअरकट करण्यासाठी श्ल्पिाला बरीच हिंमत दाखवावी लागली. कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘कोणताही दिवस जोखमीशिवाय आणि कम्फर्ट झोन बाहेर न येता जगता येत नाही. मग तो अंडरकट बज कट का असेना. खरं सांगते हा हेअरकट करण्यासाठी मला खूप मोठी हिंमत दाखवावी लागली.’

शिल्पाचा हा नवा हेअरकट म्हटल्यावर त्यावर प्रतिक्रिया उमटणारच. अनेक नेटक-यांनी तिच्या या हेअरकटची खिल्ली उडवली आहे. ये आधा टकला क्यों? ऐसा हेअरकट कैसे करवा सकते हो आप?  ऐसा हेअरकट कैसे करवा सकते हो आप? यकीन नहीं हो रहा, अशा अनेक कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.आधे सिर का क्या कुसूर था, अशी मजेशीर कमेंट अन्य एका युजरने केली आहे.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीबॉलिवूड